राजकारणाची, समाजकारणाची आणि प्रसार माध्यमांची पारंपरिक समीकरणे बदलवत गाव माझा ब्राँडकास्ट लिमिटेड (CIN.NO U22219MH2017PLC293258) ह्या पब्लिक लिमिटेड कंपनी अंतर्गत गाव माझा न्यूजने महाराष्ट्र दिनी १ मे २०१७ पासून महाराष्ट्रात मुंबईहून आपला प्रवास सुरु केला असून गाव माझा न्यूज चॅनलला सोशल मीडिया आणि लहान केबल नेटवर्क द्वारे जनतेने महाराष्ट्रात टॉप १० अग्रगण्य मराठी न्यूज चॅनल मध्ये आतापर्यंत पसंती दिली आहे. गाव माझा न्यूजला साडे तीन लाखाहून अधिक सब्स्क्रायबर असून मागील मागील साडे सहा वर्षात साडे सहा कोटींहून अधिक प्रेक्षकांनी आमच्या न्यूज चॅनेल ला पसंती दिली आहे.
गाव माझा न्यूज हे ग्रामिण व शहरी भागातील सामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी अविरत काम करत आहे. ग्रामिण भागासाठी केबल टि व्ही व सोशल मिडिया / वेब द्वारे काम करणारे गाव माझा न्यूज हे महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे मराठी न्यूज चॅनल ठरले आहे. महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात मिळून गाव माझा न्यूजचे ८०० हुन अधिक पत्रकार काम करत आहेत.
आतापर्यंत महाराष्ट्रातील किमान २७००० ग्रामपंचायतीपर्यंत गाव माझा टीम पोहोचली असून ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन राम राम सरपंच या कार्यक्रमाद्वारे गावांचा विकास आढावा करून ग्रामीण विकासाचे एक मॉडेल उभारणे गाव माझा न्युजने सुरु केले आहे
वर्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मिशन खासदार २०१९ या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्रातील ४८ लोकसभा क्षेत्रातील तत्कालीन, माजी व इच्छुक खासदार उमेदवारांची प्रत्यक्ष भेट व मुलाखत घेऊन देशातील विविध ज्वलंत समस्या, प्रश्न व उमेदवारांचे प्लॅन जनतेसमोर निर्भीडपणे मांडण्याचे कार्य गाव माझा न्युज द्वारे करण्यात आले
वर्ष २०१९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान बोला आमदार या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्रातील किमान २०० हून अधिक विधानसभा क्षेत्रातील तत्कालीन आमदार, इच्छुक आमदार, माजी व भावी आमदारांची प्रत्यक्ष इंटरव्यू घेऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न थेट पोहोचवण्याचे कार्य गाव माझा द्वारे करण्यात आले.
वर्ष २०१६ पासून महाराष्ट्रातील सर्व किमान ३० मंत्रालयांच्या कार्यपद्धतींचा सखोल अभ्यास करून मंत्रालयापासून तर गावापर्यंत येणाऱ्या निधीची विल्हेवाट कशी लावल्या जाते आणि जनता कशाप्रकारे वंचित राहते या सर्व गोष्टींचा आढावा गाव माझा न्युज ने गाव माझा दरबार ह्या कार्यक्रमाद्वारे केलेला आहे.
वर्ष २०२०-२१ मध्ये कोविड परिस्थिती दरम्यान महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला होणाऱ्या विविध समस्यांना तसेच त्यांच्या विविध मागण्यांना प्रशासन व सरकार समोर आणून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी १०० % निशुल्क मदत गाव माझा न्युजने केलेली आहे.
येत्या १ मे - २०२४, महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर गाव माझा न्यूज चॅनलच्या न्यूज बिल्डिंग व मीडिया मशिनरी उभारून न्यूज चॅनेल चे सॉफ्ट ट्रायल रन करण्याचे नियोजित आहे.
१५ ऑगस्ट -२०२४, देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर गाव माझा न्यूज चॅनल (मराठी व हिंदी भाषेत) सॅटेलाईट द्वारे तसेच इतर १४ प्रादेशिक भाषांमध्ये ओटीटी द्वारे भारतातील कानाकोपऱ्यात पोहोचून देशपातळीवर आपले वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज आहे.